यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बैलगाडीने शेतात जात असलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीवर खंब्यावरील विद्यूत तार तुटून पडल्याने शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चिखली बुद्रुक शिवारात घटली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यशवंत कामा महाजन (वय-६२) रा. चिखली बुद्रुक ता. यावल असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यशवंत कामा महाजन हे चिखली येथे आपल्या परिवारासह राहत होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे गुरूवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास यशवंत महाजन हे बैलगाडीने चिंखली बुद्रुक शिवारातील आपल्या शेतात रस्त्याने जात असतांना अचानक विद्यूत खंब्यावरील तार तुडून बैलगाडीवर पडली. यात वीजेच्या तीव्र झटक्याने यशवंत महाजन आणि एक बैल जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व ईलेक्ट्रीक वायरमन यांनी धाव घेतली. सुरूवातील विद्यूत प्रवाह बंद करण्यात येवून त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी मयत घोषीत केले. या घटने चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे. यासंदर्भात फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश सानप करीत आहे.