महापालिकेत गणरायाचे जल्लोषात आगमन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेत मानाचा गणपती स्थापन करण्याची परंपरा आहे. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते विधीवत पुजन करून गणरायाची स्थापना बुधवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने डोकेवर काढल्याने गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध लावण्यात आले होते. यावर्षी कोरोना आटोक्यात असल्याने गणरायाच्या स्वागताचा तयारी जल्लोषात करण्यात येत आहे. जळगाव महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मानाचा गणपती स्थापना करण्यात येत असतो. या अनुषांगाने शहरातील शास्त्री टॉवर चौक येथून महापालिकेच्या गणपतीची मिरवणूक ट्रॅक्टरवरून काढण्यात आली. यावेळी पारंपारिक पध्दतीने महिलांनी साड्या परिधान केले होते. ढोल ताश्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक महापालिकेपर्यंत काढण्यात आली.

या मिरवणूकीत महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, विरोधी पक्ष नेता सुनिल महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी ढोल ताश्यांच्या तालावर ठेका घेतला होता.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1267912737284951

Protected Content