Home क्राईम अरुणाचल प्रदेशमध्ये दहशतवाद्यांकडून आमदारासह 11 जणांची हत्या

अरुणाचल प्रदेशमध्ये दहशतवाद्यांकडून आमदारासह 11 जणांची हत्या


mla dead

इटानगर( (वृत्तसंस्था) अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचे आमदार तिरोंग अबो यांच्या घरावर हल्ला करत 10 जणांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात झाली आहे.NSCN (नॅशनल सोशालिस्ट काउंसिल ऑफ नागालँड) च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्याच्या मागे हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

अबो अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम जागेवरून आमदार आहेत. आज दहशतवाद्यांनी तिरोंग अबो यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी पहिल्यांदा अबो यांची हत्या केली. त्यानंतर कुटुंबातील 10 सदस्यांची देखील हत्या केली. हा हल्ला नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडच्या दहशतवाद्यांद्वारे करण्यात आला आहे. दरम्यान, नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड एक दहशतवादी संघटना आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound