प.पू. झिपरू अण्णा पुण्यतिथीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन (व्हिडीओ)

Jhipru anna

 

 

जळगाव प्रतिनिधी । परमपुज्य श्री. झिपरू अण्णा महाराज यांच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील नशिराबाद येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताह व श्री अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह 21 ते 28 मे दरम्यान होणार असून भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिमुकले राममंदीराचे परमपुज्य दादा जोशी यांनी भाविकांना केले आहे.

कार्यक्रमाची दैनंदिनी याप्रमाणे
सकाळी 5 ते 6.30 काकडा आरती, श्री विष्णुसहस्त्र नाम, प्रार्थना आणि पसायदान, 6.30 ते 7.30 वाजता श्रीचा अभिषेक, पुजा, आरती, 7.30 ते 11.30 श्री ज्ञानेश्वरी परायण, दुपारी 4 ते 6 हरिपाठ व श्रीमद्भागवत गीता पाठ, होणार आहे. आणि दररोज रात्री 7 ते 10 श्रीमद्भागवत कथा असा होणार असून श्री ज्ञानेश्वरी पारायण हभप सुपाअण्णा सदाफळे हे वाचणार आहे.

इतर कार्यक्रम
23 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान प.पू. झिपरूअण्णा महाराज पोथीचे सामुहिक पारायण. 27 रोजी सकाळी 10 ते 12 पर्यंत श्री गुरूदेव सिध्दपीठ गणेशपुरी व ध्यान योग केंद्र, नशिराबाद यांचे विद्यमान सत्संग. 25 रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान परमार्थ सेवा केंद्र, येथे सामुहिक पारायण आणि 28 रोजी सकाळी 7.30 ते 8 वाजता सत्यनारायण पुजन व सकाळी 8 ते 11.30 वाजता श्रीच्या पादुकांची पालखीसह भव्य शोभयांत्रा निघणार आहे.

यांचा राहणार सहकार्य
गायनाचार्य – हभप विठाबा महाराज, घाडवेल. मृदुंगाचार्य – हभप संजय महाराज, कान्हेरेकर. हभप संजय महाजन माळी, नशिराबाद. हभप साहेबराव महाराज, धरणगाव. विणेकारी – निवृत्तीबाबा येवले, युवराज माळी, सुधाकर माळी. मंदीराचे पुजारी- जयंत प्रभाकर गुरव आणि मुळेबुवा बोरनारे, भजनी मंडळे – श्री मुक्तेश्वर मंदिर, श्री सावता महाराज मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री ज्ञानेश्वर मंदीर आणि श्री कृष्ण मंदिराचे मंडळाचे सहकार्य लाभणार आहे.

Add Comment

Protected Content