जळगाव (प्रतिनिधी) श्यामसिंग राजू चव्हाण हा एमआयडीसी पो.स्टे.त २१ वर्षांपासून सफाई कामगार म्हणून मानधनावर काम करीत आहे. त्यास लहानपणापासून कमी दिसत असून अशा परिस्थितीत संघर्ष करून तो कामकाज करीत आहे. त्याचे डोळ्यांचे ऑपरेशन हैदराबाद येथे एल.बी. प्रसाद हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असून त्यासाठी त्याला एमआयडीसी पोस्टचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट व स्पेक्ट्रम कंपनीचे दीपक चौधरी यांच्यातर्फे नुकतीच ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. ही मदत स्पेक्ट्रम कंपनी व एमआयडीसी पो.स्टे.चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून केली आहे.
अधू दृष्टी असलेल्या सफाई कामगाराला ऑपरेशनसाठी आर्थिक मदत
5 years ago
No Comments