पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील ग्रामस्थ व महादेव मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही पोळ्याच्या मुहूर्तावर हरीनाम किर्तन सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली.
पहील्या दिवसाची सेवा येथील ह. भ. प. देवयानी महाराज यांच्या किर्तनाने झाली. आठ दिवस चालणाऱ्या या किर्तन सप्ताहाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी किर्तन श्रवणासाठी महिलासह भाविकांच्या गर्दीने संपूर्ण महादेव मंदिर प्रांगण श्रोत्यांनी पुरुन गेले होते. ह. भ. प. देवयानी महाराज यांनी आपल्या किर्तनातुन तरुण पिढीला उद्देशून किर्तन सप्ताहाचा खरा उद्देश कधी साध्य होईल जेव्हा गावातील युवा पिढी निम्मे तरी व्यसनाचा त्याग करेल तरच या सप्ताहांचा खरा उद्देश साध्य होणार असल्याचे सांगितले.
उत्कूष्ट असे भजनी मंडळ गावातील पोळ्याच्या सनाला सकाळी गावातील प्रत्येक देवळात नैवेद्य देऊन दुपारी हरीनाम किर्तन सप्ताहाची स्थापना संध्याकाळी गावातील पाहूण्या बैलाला मानदेऊन पोळा साजरा करण्याची गावाची परंपरा श्रावण महिन्यात हरीनाम किर्तन सप्ताहाच्या सांगता होईल पर्यंत सव्वा महिना गावातील मांस विक्री बंद असते अशा आदर्श गावाची सुन होण्याचे भाग्य मला लाभल्याचे प्रतिपादन ह. भ. प. देवयानी महाराज यांनी आपल्या किर्तनातुन मांडले. महिला व ग्रामस्थाची उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला.