जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केसीई सोसायटीच्या मू.जे महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने संस्कृतसप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचा समारोप उद्या डॉ. जयश्री झारे सकळकळे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.
संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने दि २२ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात संस्कृत श्लोकपठण, स्तोत्र पठण, वक्तृत्व, निबंध, शोधनिबंध स्पर्धांचा समावेश आहे. आज शुक्रवार दि.२६ रोजी जिल्हास्तरीय शालेय संस्कृत समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील १२ शाळा सहभागी झाल्यात. या स्पर्धेत ओरीयन सीबीएसई शाळेला प्रथम क्रमांक, शानबाग विद्यालयाला द्वितीय, ए.टी.झांबरे विद्यालयाला तिसरे आणि केंद्रीय विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. या संस्कृत सप्ताहाचा समारोप उद्या दि. २७ शनिवार रोजी डॉ. जयश्री झारे सकळकळे यांच्या हस्ते होणार असून त्यांचे ‘कालिदासाच्या साहित्यातील निसर्ग आणि चित्रकला’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्कृत विभागाच्या वतीने केले आहे.