मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथाचे आज प्रकाशन करण्यात आले.
आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात वि.स. पागे संसदीय प्रकाशन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आयोजित स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित भूमिपुत्र या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन आज करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ नीलम गोर्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते राम नाईक विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नरहरी झिरवळ, सुनीताताई फुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भाऊसाहेब फुंडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव केला.