जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शिवाजी नगर येथील स्कॉलर डिजीटल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये ‘गोपालकाला’ निमित्त रेशा क्रिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला रंगभरण स्पर्धेचे दोन गटात आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा उत्साहात पार पडला.
पहिला गट:- प्रथम क्रमांक- हर्षल सुदर्शन पवार, द्वितीय- असरा शोयब शेख, तृतीय- यज्ञेश महेश कोळी, उत्तेजनार्थ- राजवीर संदीप पवार व दुसरा गट :- प्रथम क्रमांक- मुददशीर शेख तोसीप, द्वितीय- रुचीका जितेंद्र रोकडे, तृतीय- अझर अशपाक खान , उत्तेजनार्थ- प्रियांशी दिपक पाटील यांना मिळाले. लहान मुलांनी रंगविलेली चित्रे पाहून पालक व पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. हे प्रदर्शन सर्वासाठी तीन दिवस शाळेच्या आवारात खुले असणार आहे.
प्रमुख पाहुण्याच्या हस्ते, श्री कृष्णांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर मुलांनी अत्यंत उत्साहात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, रेशा क्रिएशनच्या संचालिका-रुपाली राज, संस्थेचे अध्यक्ष- दिपक सुरळकर, मुख्याध्यापिका- adv. ज्योती सुरळकर, सामाजिक कार्यकर्ते- किरण भामरे व चित्रकला स्पर्धा परीक्षक- प्रा. राज गुंगे उपस्थित होते. आपल्या मनोगतात प्रा. राज म्हणाले, कलेचे गुण मुलांमध्ये लहानपणापासूनच उपजत असतात त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे. अशा स्पर्धांमधून मुलांचे सुप्त गुण निदर्शनास येतात त्यामुळे विविध स्पर्धांचे आयोजन केलेच पाहिजे.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व बहुसंख्य पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कोल्हे यांनी तर सर्व पालक, आयोजक, पाहुणे व सहकारी यांचे आभार भाग्यश्री शिंदे यांनी व्यक्त केले. स्पर्धा आणि दहीहंडीच्या आयोजनासाठी आरती कौशल, वैशाली सोनवणे, मोनिका पटेल, शितल तुळसकर यांनी परिश्रम घेतले.