Home Cities जळगाव प.वि.पाटील विद्यालयात बहिणाबाई जयंती साजरी 

प.वि.पाटील विद्यालयात बहिणाबाई जयंती साजरी 

0
47

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्या. रेखा पाटील यांच्या हस्ते कवयित्री बहीणाबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कवितांचे व गीतांचे सादरीकरण केले उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या जीवनकार्याची माहिती सांगितली प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound