Home Cities एरंडोल आडगाव येथे शेतकर्‍याची आत्महत्या

आडगाव येथे शेतकर्‍याची आत्महत्या

0
89

aadgaon shetkariकासोदा ता एरंडोल प्रतिनिधी । येथून जवळस असणार्‍या आडगाव येथील प्रल्हाद वेडू महाजन या शेतकर्‍याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

गावालगत असलेल्या पांढरी शिवारात दि २० रोजी प्रल्हाद वेडू महाजन ( वय ७८ ) हे शौचालयास गेले असता तेथे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रल्हाद महाजन यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. दुष्काळी परिस्थिती असल्याने कोणतेही शेतीचे उत्पन्न आलेले नव्हते शिवाय विविध कार्यकारी सोसायटीचे ३० हजार रूपये कर्ज स्वतःच्या नावावर असून मुलाच्या नावावर ४० हजार रू कर्ज होते त्यांना तीन मुले व सुना असून त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. ते हभप दिलीप महाराज यांचे वडिल होत. या प्रकरणी कासोदा स्थानकात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहा फौजदार विजय पाटील करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound