दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

shetkari sanghatana

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली असून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व एरंडोल नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. यात म्हटले आहे की, एरंडोल तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अंजनी काठावरील दहा ते बारा गावात पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती झाली आहे. गुराढोरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने पशुधन धोक्यात आले आहे. तर विहिरी कोरड्याठाक झाल्या असून तात्काळ गिरणा धरणातून अंजनी नदीद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्याची गरज आहे. याशिवाय, शेतीकर्जाची बँकांमार्फत होणारी वसुली थांबवावी. एरंडोल व धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ निधी उपलब्ध व्हावा अशा विविध मागण्याचे निवेदन जळगाव जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान दयाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे एरंडोल तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, एरंडोल माजी नगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, तालुका उपाध्यक्ष रवींद्र पाटील, जळूचे सरपंच रवींद्र जाधव, जगदीश पाटील ,आदर्श शेतकरी प्रसाद दंडवते, सतीश महाजन, सचिन पाटील, महेश पाटील, पत्रकार शालिग्राम पाटील उपस्थित होते. या मागण्यांबाबत तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एरंडोल तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनेही ह्याच मागण्यासाठी तहसील कचेरीत तालुकाध्यक्ष सुरेश बळीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content