Home क्राईम चिखलीत दहीहंडीला गालबोट 

चिखलीत दहीहंडीला गालबोट 

0
35

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सर्वत्र दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात झालेल्या दहीहंडीत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले व भाजपा युवा मोर्चाने ही दहीहंडी आयोजित केली होती. ज्यामध्ये दहीहंडी कार्यक्रमात हजारो तरुणांनी हजेरी लावली आणि ते मनसोक्त नाचत असतांनाच दहीहंडी फोडण्यासाठी जमलेल्या गोविंदांमध्ये अचानक वाद झाला, या किरकोळ कारणाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर घाई घाईमध्ये दहीहंडी फोडण्यात आली.

दरम्यान, या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Protected Content

Play sound