पाचोऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी ४०० किलो वजनाचा हार

Pachora News पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज जिल्हा दौरा असून पाचोरा मतदार संघात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी पाचोरा शहरात ४०० किलो वजनाचा हार घालून करण्यात येणार आहे.

बंडखोर आमदारांच्या मतदार संघात माजी मंत्री तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २० ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा आणि धरणगाव येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या स्वागतासाठी पाचोरा शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, माजी आमदार स्व.आर.ओ.तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागत ४०० किलो वजनाचा हार घालुन करण्यात येणार आहे.

Protected Content