पुणे येथे अॅग्रिझोन कंपनीचे उदघाटन

23e219df 6662 4c66 80a6 fd68499969a6

पुणे (विशेष प्रतिनिधी) शेती मालावरील औजारे ऑनलाईन विकणाऱ्या ‘अॅग्रिझोन कंपनी’चे उद्घाटन प्रगतीशील शेतकरी तथा वसुंधरा शेतकरी उत्पादक समूहाचे अध्यक्ष संजय कुंभारकर यांच्या हस्ते येथे नुकतेच करण्यात आले तर वसुंधरा फौंडेशनच्या अध्यक्षा कोमल ढोबळे यांच्या हस्ते कंपनीच्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले.

 

 

या कार्यक्रमास वसुंधरासमूह शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिव संजय जगताप यांची विशेष उपस्थित होती. आजकाल शेतकरी स्वयंपूर्ण होवा यासाठी शासन अनेक योजना सादर करत आहे, मात्र त्या योजनांचा पाठलाग करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे.  या योजनेतून एकाद्या शेती औजारावर मिळणार अनुदान हे किमतीत वाढलेले असते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळूनही काही फायदा होत नाही. शेतकऱ्यांची हिच व्यथा युवा उद्योजक अंजुम पटेल यांनी ओळखली व राज्यातील अनेक शेती औजारे, बी बियाणे, खते मिळणाऱ्या कंपनीसोबत संपर्क करुन कंपनी ते शेतकरी अशी ऑनलाइन सेवा देणाऱ्या ऍग्रिझोन ह्या कंपनीची स्थापना केली. सुरवातीलाच या कंपनीने संपुर्ण महाराष्ट्रात आपले जाळे विणले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मार्केटपेक्षा ३०% कमी दरात शेती उपयोगी वस्तू उपलब्ध  होणार आहेत, असे अंजुम पटेल यांनी कळवले आहे.

Add Comment

Protected Content