रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पातोंडीजवळ आज सकाळी एका ४८ वर्षीय महिलेचा खड्डा चुकवताना मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे मृत्यू होणारी हि आठवडाभरातील दुसरी घटना असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की, मोटरसायक वरील आई व मुलगा मुक्ताईनगर कडे जात असतांना पातोंडी नजिक मोटरसायकलवर मागे बसलेली महिला मिरा रविंद्र वाघोदे (वय 48 रा. चिनावल) यांच्या मोटरसायकलवरुन खाली पडल्याने डोक्याला दुखापत झाली. तात्काळ उपचारार्थ रावेर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी मृत्य घोषीत केले. खड्डा चुकवतांना मृत्यु झाल्याची चर्चा रावेर ग्रामीण रुग्णालयात जमलेल्या नागरीकांमध्ये होती. अशीच घटना बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर रावेर नजिक घडली होती. यामध्ये देखिल एका महिलेचा मृत्यु झाला होता.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग वर पडलेले खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे.