जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुकाध्यक्षांची निवड करण्यासाठी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक पार पडली.
राष्ट्रवादीच्या जामनेर तालुकाध्यक्षांचे पद तीन वर्षांपासून रिक्त असून याबाबत निर्णय घेण्यासाठी येथील बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये रविवारी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक हे अध्यक्षपदी होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ नेते संजय गरूड, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, डी. के. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी तालुकाध्यक्षांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून याबाबत येत्या काही दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित असल्याचे अविनाश आदिक यांनी सांगितले.