मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे पत्रा चाळ घोटाळ्यात खासदार संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला असतांना आता त्यांच्या पत्नीलाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात आज संजय राऊत यांना दुसर्यांदा ईडीची कोठडी मिळाली आहे. यानंतर त्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. वर्षा राऊत यांना देखील ईडीने आता समन्स बजावले आहे. पाच ऑगस्ट रोजीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी होण्याची शक्यता आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? बाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे. यामुळे या प्रकरणात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची एकत्रित चौकशी होऊ शकते अशी माहिती होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीला देखील ईडीने समन्स बजावल्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमके काय होणा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.