स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ४ थ्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.  यावेळी स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या १४३ रक्तदाते मित्रपरिवाराने रक्तदान करून स्व.नरेंद्रअण्णा यांना अभिवादन केले.

 

स्व.  नरेंद्रअण्णा पाटील  यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी  स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांच्या आठवणीना उजाळा दिला. या रक्तदान शिबिराला जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर, जि. प .सदस्य प्रताप पाटील, आमदार राजूमामा भोळे,  जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष  अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशमुख, प्रतिभाताई शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान संचलित कधीही रक्तदाता या उपक्रमांतर्गत रक्तदान चळवळ मार्फत गेल्या वर्षभरात ८५ गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.  तसेच गेल्या ६ वर्षात  ९३० तात्काळ रक्त लागत असलेल्या गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने निस्वार्थ मोफत केले आहे.  भविष्यात देखील करत राहणार आहेत.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल चौधरी, योगेश निंबाळकर, प्रशांत चौधरी, भावेश चौधरी, यश चौधरी, अजिंक्य पाटील, देविदास ठाकरे, आदेश देशमुख, तन्मय चौधरी, चेतन अटाळे, नितीन सूर्यवंशी, सूनय पाटील, निखिल पोपटानी, प्रतीक भिंगारे, राहुल शर्मा किरण बारी, मयूर चौधरी, सारंग चौधरी, मंगेश पानपाटील, नयन खडके, नितेश बदाने आदी मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.

Protected Content