Home Cities धरणगाव आ.गुलाबराव पाटील यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

आ.गुलाबराव पाटील यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

0
24


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा असलेल्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये राज्याचे माजी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडून गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, जेष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, पी.आर.सोनवणे आणि शिक्षकांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी एच.डी.माळी, सी.एम.भोळे, पी.डी.पाटील, व्ही.पी.वऱ्हाडे, एम.जे.महाजन, ज्येष्ठ लिपीक जे.एस.महाजन, पी.डी.बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, अशोक पाटील, जीवन भोई, प्रदीप पवार आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्ही.टी.माळी यांनी तर आभार एस.व्ही.आढावे यांनी मानले.


Protected Content

Play sound