बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मार्केट कमिटीच्या समोर आलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल ३१ लाखांची रोकड लांबविल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “नाडगाव रोडवरील मार्केट कमिटीच्या समोर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम बसविण्यात आले आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून तब्बल ३१ लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुरूवातीला एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडले. हा प्रकार सोमवारी २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.