वाळूच्या ट्रॅक्टरची माहिती दिल्याच्या संशयावरून मारहाण

 

यावल : प्रतिनिधी  । सावखेडासिम येथे तहसीलदार यांनी वाळुचे ट्रॅक्टर पकडल्याने विचारण्यावरून पाच लोकांनी फिर्यादीच्या आईस शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली यावल पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे .

 

२ जुलै रोजी दुपारी सावखेडासिम येथील मथुराबाई पाटील ( ६५ वर्ष )  यांनी दिलेल्या माहीतीनुसार गावातील पंकज बडगुजर , राहुल बडगुजर , जिवराम बडगुजर , दिपाली बडगुजर आणी शंकुतला बडगुजर यांनी  भुषण पाटील यांच्या घरासमोर पंकज बडगुजर यांना माझा मुलगा प्रकाश पाटील , दिलीप पाटील ,  पुतण्या विजय पाटील आणी चेतन पाटील गावातील वडाच्या झाडाखाली सार्वजनिक ठीकाणी उभे असलेले रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदार यांनी पकडल्याचे विचारणा करण्यासाठी गेले असता वरील संशयीत इसमांनी मला व माझ्या कुटुंबातील मंडळीस शिवीगाळ व मारहाण केली .

 

मथुराबाई पाटील यांनी फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग ५ गुरन११७ / २o२१प्रमाणे भादवी १४३, १४७ , १४९ , ५०९, ३२३ , ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे .

 

Protected Content