जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आ. गुलाबराव पाटील यांची आज सिखवाल ब्राम्हण समाज मंडळाच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला.
तत्कालीन पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील हे मतदारसंघात आले असून समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिक त्यांच्या भेटी घेत आहेत. या अनुषंगाने आज सिखवाल ब्राह्मण समाज संस्थेच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली. आपला समाज हा आधीपासूनच आ. गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी असून त्यांनी जो नवीन मार्ग निवडला त्या निर्णयाचे आपण समर्थन करत असल्याचे सांगत त्यांना पाठींबा देत असल्याचे याप्रसंगी पदाधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, आ. गुलाबराव पाटील हे राज्य मंत्रीमंडळात महत्वाच्या मंत्रीपदी विराजमान होवोत यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सिखवाल ब्राह्मण समाज मंडळाचे कैलास पांडे, पप्पू तिवारी, बाळा पंडित, संजू पांडे, शशी व्यास, सुमीत पंडित, चेतन तिवारी, निखील शर्मा, हरी सिखवाल, नारायण तिवारी, दिलीप सिखवाल, प्रदीप जोशी, चेतन तिवारी, गोपाल पंडित, विनोद पांडे, सतीश पांडे, संजय पांडे, विनोद पांडे, सोनू पांडे, निखील व्यास, किसन तिवारी, गोपाल तिवारी, हरी व्यास, पंकज व्यास, विजय व्यास आणि अशोक ओझा आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती.