चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आरोग्य खात्याच्या भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत आज तालुक्यातील बोगस डॉक्टर्सवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, “चाळीसगाव तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर्स कार्यरत असून ते रूग्णाच्या जीवांशी खेळ करत असल्याच्या अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने आज आरोग्य खात्याच्या भरारी पथकाने या मुन्नाभाईंवर धडक कारवाई केली. यात आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील उपखेड येथील तन्मय दीपक पाठक, पिलखोड येथील डॉ. संजय साळुंखे, डॉ. मृणा सरकार पोहरे येथील शहाजात कोमल मुजुमदार या चौघासह एकूण आठ जणांवर चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे मात्र पसार झाले आहेत.
सदर कारवाई करणार्या पथकात तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे ,डॉ. संदीप निकम, दिपक वाणी, विलास भोई, आर. आय. पाटील, डॉ.धीरज पाटील आदींचा समावेश होता. या कारवाईमुळे तालुक्यातील बोगस डॉक्टर्सला धडकी भरली असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे.