Home Cities जळगाव मानराज पार्क मैदानावर महाराष्ट्र पर्यावरण सखी मंचच्या विद्यमाने वृक्षारोपण

मानराज पार्क मैदानावर महाराष्ट्र पर्यावरण सखी मंचच्या विद्यमाने वृक्षारोपण

0
30

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील  मानराज पार्क मैदानावर रविवार, १७  जुलै रोजी महाराष्ट्र पर्यावरण सखी मंच आणि मानराज फुटबॉल व क्रिकेट असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.

 

महाराष्ट्र पर्यावरण सखी मंचतर्फे मानराज पार्क मैदानावर २० झाडांचे वृक्षारोपण  करण्यात आले. याप्रसंगी जळगाव तालुक्याचे जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख , महाराष्ट्र पर्यावरण सखी मंच जिल्हाध्यक्ष  मनीषा पाटील, एबीपी माझाचे पत्रकार चंद्रशेखर नेवे, महाराष्ट्र पर्यावरण सखी मंच जळगाव तालुकाध्यक्ष मनिषा शैलेश शिरसाठ, पर्यावरण सदस्य नीलिमा झांबरे, पद्मश्री खिराडे, कामिनी पाटील, मानराज पार्क क्रिकेट व फुटबॉल टीम असोसिएशनचे  सुनील बोरसे आणि त्यांची टीम तसेच शैलेश शिरसाठ आणि जळगाव प्लॉगर्स चे निखिल पेंढारकर आणि चेतना जैन  हे उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound