यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा येथे जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये निधी खर्चातून बांधण्यात येत असलेल्या शाळा खोलीचे काम निकृष्ट प्रतीचे व अपूर्ण अवस्थेत असतांना ठेकेदारास कामाचे पुर्ण पैसे अदा करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, संबंधितांच्या बेजबाबदार कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भातील मिळालेली अधिक माहिती अशी की, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा या गावात जिल्हा परिषदच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चाच्या निधीतुन दिव्यांग चिमकुल्यांना बाळांना त्यांच्या मुलभुत हक्क शिक्षण मिळावे या दृष्टीकोणातुन शासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नाविन शाळा खोली बांधण्यात येत आहे.
सदरचे या शाळा खोलीचे बांधकाम शासकीय नियमानुसार साहित्य न वापरता अत्यंत निकृष्ट प्रतीचे करण्यात येत आहे. संबंधीत ठेकेदाराने यापूर्वी ही गावात शासकीय निधीतुन अशाच प्रकारची निकृष्ट कामे केली आहेत. या कामांची देखील कुठलीही वरिष्ठांच्या माध्यमातून चौकशी न करता बिले अदा करण्यात आली असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. असे असतांना सदरच्या ठेकेदारांने अपुर्ण केलेल्या दिव्यांग शाळा खोलीच्या कामांचे संपुर्ण बिल कशा व कोणत्या आधारावर काढण्यात आलीत या सर्व ग्रामपंचायत , पंचायत समिती स्तरावरील गोंधळलेल्या भ्रष्ट कारभाराची तात्काळ चौकशी करण्यात येवुन संबंधीत ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येवून त्यास सहकार्य करणाऱ्या अधिकाराऱ्यांवर देखील कार्यवाही करण्यात यावी मागणी डोंगर कठोरा गावातून होत आहे.