मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आधीच्या सरकारने घेतलेला छत्रपती संभाजीनगर, धाराशीव आणि नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबात शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव असे करण्यात आले होते. यासोबत नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक अवैध असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा नामांतर करण्यात येणार असल्याचे कालच जाहीर केले होते.
या अनुषंगाने आज मंत्रीमंडळाची बैठक झाली. यात औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादला धाराशीव असे नामांतर मंजूर करण्यात आले. तर नवी मुंबईच्या विमानतळाला दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असून यातून ही तिन्ही नावे बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.