नामांतराची स्थगिती उठावा, अन्यथा रस्त्यावर उतरू; शिंदे सरकारला अल्टिमेंटम

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराला स्थिगीती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे.  लवकरात लवकर या निर्णयावरील स्थगिती उठवून महिनाभरात केंद्रातून या निर्णयाला मंजुरी मिळावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा, औरंगाबादचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

 

नामांतराचं श्रेय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू नये, यासाठी शिंदे सरकारचा खटाटोप सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराला स्थिगिती देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे. लवकरात लवकर या निर्णयावरील स्थगिती उठवून महिनाभरात केंद्रातून या निर्णयाला मंजुरी मिळावी. अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेट बैठकीत नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र सरकारने हा निर्णय घाई-घाईत घेतला असून काही सुधारणांसह प्रस्ताव आणला जाईल, असे एकनाथ शिंदे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. 

Protected Content