Home Cities रावेर स्नेहजा रुपवते अनंतात विलीन

स्नेहजा रुपवते अनंतात विलीन

0
123

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व.मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या स्नेहजा प्रेमानंद रुपवते यांच्यावर खिरोदा येथे मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कन्या तथा भाची यज्ञा यांच्या लग्नसमारंभासाठी स्नेहजा रुपवते खिरोदा येथे आल्या होत्या. रविवारी (दि.१२) मुंबईकडे जाताना त्यांच्या कारला पाळधीजवळ अपघात झाला. त्यात स्नेहजा यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्नेहजा यांच्या कन्या बंधमुक्ता खान व उत्कर्षा सालीयान यांनी त्यांना अग्नीडाग दिला. याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, विनायकराव देशमुख, मासाकाचे चेअरमन शरद महाजन आदींसह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound