Home Cities जळगाव मुळजी जेठा महाविद्यालयात मानवतेसाठी योग व्याख्यानाचे आयोजन

मुळजी जेठा महाविद्यालयात मानवतेसाठी योग व्याख्यानाचे आयोजन

0
28

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुळजी जेठा महाविद्यालयात शनिवार दि. ९ जुलै रोजी प्रा. डॉ.सुरेश बर्नवाल यांचे मानवतेसाठी योग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुळजी जेठा महाविद्यालयातील तत्वज्ञान विभाग आयोजित भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद नवी दिल्ली प्रायोजित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिनानिम्मित मानवतेसाठी योग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान हरिद्वार येथील देव संस्कृती विद्यापीठाचे योग विभागप्रमुख प्रा. डॉ.सुरेश बर्नवाल हे देणार आहेत. व्याख्यानाचे आयोजन शनिवार दि. ९ जुलै सकाळी १० वाजता नवीन कॉन्फरन्स हॉल,मू.जे.महाविद्यालय येथे करण्यात आले आहे . या व्याखानाला उपस्थितीचे आवाहन विभागप्रमुख डॉ. राजकुमारी सिन्हा यांनी केले आहे.


Protected Content

Play sound