जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको भागातील गौतम नगरातून राहत्या घरातून तरुणाचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास सदाशिव अहिरे (वय-२५) रा. गौतम नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव हा आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. हा तरुण अपंग असून घरीच बसून आहे. रविवारी ३ जुलै रोजी रात्री १० वाजता जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्याचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल राहत्या घरातील खिडकीतून चोरून नेला. हा प्रकार सोमवारी ४ जुलै रोजी उघडकीला आला. शोधूनही मोबाईल न मिळाल्याने अखेर मंगळवार ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.