Home Cities धरणगाव धरणगावात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

धरणगावात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

0
106

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | धरणगाव नगरपालिकेतर्फे मुख्य अधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ७ व्यावसायिकांवर प्रत्येकी ५ हजार रु. प्रमाणे दंडात्मक कारवाई करून एकुण ३५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आणि १५ किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले.

धरणगाव नगरपालिकेतर्फे मुख्य अधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव पाटील कर निरीक्षक, तुषार सोनार, कार्यालय अधीक्षक संजय मिसर, अनिल पाटील, प्रवीण देशपांडे, भगवान माळी, सिकंदर पवार, दीपक वाघमारे, पुनीत चौधरी, प्रशांत चौधरी, मुझ्झमिल शेख, सचिन झीने, अण्णा महाजन, रामकृष्ण महाजन, शिरीष पाटील, जगन फुलपगार, वसंत चव्हाण यांनी करवाई केली.


Protected Content

Play sound