शरीराची सर्विसिंग करणे गरजेचे – डॉ. स्नेहल फेगडे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आपले भविष्य चांगले होण्यासाठी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या शरीराची सर्विसिंग करणे गरजेचे आहे त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम केला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर डे च्या निमित्ताने डॉ. स्नेहल फेगडे यांनी व्यक्त केले.

 

नेहमीच अहोरात्र रुग्णसेवा करीत माणसाला एक नवीन आयुष्य प्रदान करणारे माणसातील एक देवमाणूस म्हणजेच डॉक्टर. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हे उद्दिष्ट समोर ठेवून लोकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आरोग्याचा कानमंत्रहा कार्यक्रम घेण्यात आला.स्वामीनारायण सर्जिकल हाॅस्पिटल चे संचालक डॉ.स्नेहल फेगडे यांचा डाॅक्टर डे निमित्त सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वेळेचे नियोजन, वेळेचा सदुपयोग शरीराचे आणि मनाचे आरोग्य याविषयी माहिती दिली कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे , बिपीन झोपे,डी.बी. चौधरी उपस्थित होते..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम कोल्हे यांनी केले तर आभार प्रिती शुक्ला यांनी केले.

Protected Content