यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फालक नगरातून ३४ वर्षीय तरूण घरात काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
मोहम्मद चांद शरीफ पटेल रा. फालक नगर, यावल असे हरविलेल्या तरूणाचे नाव आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद चांद शरीफ पटेल हा आपल्या पत्नी व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २५ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरात काहीही न सांगता तो बेपत्ता झाला आहे. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी रेश्मा चांद पटेल यांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला परंतू कुठेही शोध न लागल्याने त्यांनी सहा दिवसांनतर शुक्रवारी १ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईका महेंद्र ठाकरे करीत आहे.