गुरांची कोंबून वाहतूक; दोन जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निर्दयतेने कोंबून गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलसांनी पकडले असून चार गुरांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून  वाहन जप्त करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बारी येथील शाळेच्या जवळून निर्दयतेने चार बैलांची वाहतूक वाहनातून होत असल्याची गोपनिय माहिती मेहुणबारे पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवार १ जुलै रोजी कारवाई करत सायंकाळी ५ वाजता (एमएच १५ एफव्ही १४१) क्रमांकाचे वाहन पोलीसांनी अडविले. त्यांनी वाहतूकीबाबत परवाना विचारले असता. त्यांच्याकडे वाहतूकीचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वाहन जप्त करून चारही बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत विकास सुधाकर गोमसाळे रा. साक्री रोड धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश महारू चौधरी रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव आणि अमजद खान खालक खान कुरेशी रा. चौधरीवाडा चाळीसगाव या दोघांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रतापसिंग मथुरे करीत आहे.

Protected Content