गारखेडा परिसरात तरूणाचा खून

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा खुर्द येथील शिवारात ३५ वर्षीय तरूणाचा खून केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गंगापूरी येथील श्याम फकीरा ठाकरे (वय-३५) हा आपल्या पत्नी विद्या यांच्यासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. २४ जून रोजी सकाळी ८ वाजता ते घरातून बाहेर पडले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केल्याचे २५ जून रोजी निष्पन्न झाले. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्या ठाकरे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहे.

 

Protected Content