जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन व आयएमएच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त जामनेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आयएमए शाखेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त जामनेर रजिस्टर डॉक्टर असोसिएशन आयएमए शाखा व जेपीसीएसआर यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 56 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले असून यावेळी रक्तदान केल्याबद्दल रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ. आर.के. पाटील, सचिव स्वप्नील सेतवाल, डॉ.विनय सोनवणे, चंद्रशेखर पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ.प्रशांत महाजन, डॉ. जयश्री पाटील, डॉ. संजीव पाटील, डॉ. नंदलाल पाटील, डॉ. हर्षद चांदा, डॉ. के. एम. जैन, डॉ. अमोल शेठ, डॉ. जयश्री पाटील, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. राजेश नाईक, डॉ. आशिष वाघ, डॉ. महेश जाधव, डॉ. अनिकेत लेले, डॉ. निकम यांच्यासह जामनेर शहरातील डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.