नवी मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पनवेल महामार्गावरील पाच वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण जखमी झाल्याची घटना आज घडली. जखमींना तातडीने जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबई कामोठे उड्डाणपुलावर रविवारी १९ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका विचित्र अपघात झाला. यात पाच वाहनांचा मोठा अपघात झाला आहे. उड्डाणपुलावर बंद पडलेल्या ट्रकचे काम सुरू होते. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या व्हॅगन आर गाडी, इनोवा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस एकमेकांवर धडकल्या. त्यात व्हॅगन आरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
कारमधील इतर सहप्रवासी व इनोव्हामधील प्रवासी असे तीन ते चार जण जखमी झाले आहेत. या जखमींवर जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॅगन आरमधील जखमींना बाहेर काढता न आल्याने शेवटी गॅस कट्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.