Home क्राईम खिडकीतून पँन्ट काढून ११ हजाराची रोकड लंपास

खिडकीतून पँन्ट काढून ११ हजाराची रोकड लंपास


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बेंडाळे नगरात मध्यरात्री घराच्या खिडकीतून पँन्ट काढून ११ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, ईच्छाराम हिम्मत पाटील (वय-७०) रा. बेंडाळे नगर जळगाव हे सेवानिवृत्त असून आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी ६ जून रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीची प्लास्टीकची जाळी उचकावून दरवाजाला टांगलेली पँन्ट बाहेर काढली व पँन्टमध्ये ठेवलेले ११ हजाराची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली. याबाबत ईच्छाराम पाटील यांनी सोमवारी ६ जून रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

 


Protected Content

Play sound