जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतील ४३ कर्मचारी आज मंगळवार, दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या समांरभात निरोप देण्यात आला.
महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, शहर अभियंता व्ही. ओ. सोनवणी. पाणीपुरवठा उपअभियंता गोपाल लुल्हे आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, उपायुक्त प्रशांत पाटील मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्तीं पाणीपुरवठा उपभियांता गोपाल लुल्हे यांनी सत्काराला उत्तर देतांना महापालिकेकडून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव सुनील गोराणे यांनी केले. याप्रसंगी महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कारानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मनपाच्या प्रशासकीय इमारतीपासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/712720603312663



