Home Cities जामनेर उमविचे विद्यार्थी भुषण पाटील यांना सुवर्णपदक

उमविचे विद्यार्थी भुषण पाटील यांना सुवर्णपदक

0
102

पहूर, ता.जामनेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वार्ताहर | पहूर पेठ येथील शिवसेना उपशहरप्रमुख सुभाष पाटील यांचे चिरंजीव भूषण सुभाष पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात पॉलीमर केमिस्ट्री एम.एस.सी. सुवर्णपदक मिळाले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे तिसावा दिक्षांत सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. पदवीदान कार्यक्रमापूर्वी विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार यावर्षी दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ९८ सुवर्णपदक प्रदान करण्यात आलीत. यात ६५ विद्यार्थिनी तर ३५ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यात पहूर पेठ येथील शिवसेना उपशहरप्रमुख सुभाष पाटील यांचे चिरंजीव भूषण सुभाष पाटील यांना सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गजानन दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, उपसरपंच श्याम सावळे, सतिश लोढा, शिवसेना शहर प्रमुख संजय तावडे, शिवसेनेचे गणेश पांढरे, माजी सरपंच अशोक देशमुख, रमेश पाटील, शिवाजी कलाल, रघुनाथ सोनवणे यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


Protected Content

Play sound