बापरे : रावेर तालुक्यातही तरूणाचा दगडाने ठेचून खून !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावात तरूणाचा दगडाने ठेचून खून झाल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच रावेर तालुक्यातील सिंगत येथेही याच प्रकारे एकाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, काल मध्यरात्रीनंतर शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळच्या गोदामाजवळ अनिकेत गणेश गायकवाड या २० वर्षाच्या तरूणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तर रावेर तालुक्यातील सिंगत येथेही याच प्रकारात खून झाला आहे.

पोलीसांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीला दिलेल्या माहिती नुसार, तालुक्यातील सिंगत येथे बलवाडी-तांदलवाडी रस्त्यावर रोडलागत सिंगत-अंदालवादी शेत रस्त्यावर दि २४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास कैलास भिका पाटील या अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. कैलास पाटील हा व्यक्ती हा गेल्या सुमारे १५ वर्षांपासून त्याच्या आईचे माहेर असलेल्या या गावात राहत असल्याचे सेकम-पिंप्री गावचे सरपंच दुर्गेश कोलते यांनी सांगितले. त्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघडकीस आल्याने परिसर हादरला आहे. शवविच्छेदन करून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पो.निरीक्षक गणेश धुमाळ हे करत आहे.

दरम्यान, पोलीसांची फॉरेन्सिक टीम घटना स्थळी दाखल झाली. गावातील मृत कैलास पाटील यांचे सापडलेले पाकीट, ओळखपत्र आणि ज्या दगडाने त्याला ठेचून मारले आहे तो दगड यासह इतर साहित्य फॉरेन्सिक टीमने तपासासाठी आपल्या ताब्यात घेतले आहे.

दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृत कैलास पाटील यांचा खून नेमका त्याच ठिकाणी झाला ? की त्याचा दुसर्‍या ठिकाणी खून करून त्यांना सापडलेल्या जागी आणण्यात आले. हे रहस्य सध्या गुलदस्त्यात आहे. कारण दगडाने ठेचून मारल्यावर त्या ठिकाणी रक्तही जास्त प्रमाणात आढळले नाही त्या कारणाने परिसरात असे बोलले जात असून या खुनाचा आरोपी जो कोणी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल.तसेच पोलिसांचे ही या बाबत तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपींचा तपास लागेल.

Protected Content