अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केंद्र सरकारने नुकतेच अबकारी करकेल्यानंतर राज्य सरकारने देखील औदार्य दाखवत दीड ते दोन रुपयांनी दर कमी केल्याचे दाखवले. परन्तु अमळनेरात मात्र याची अमलबजावणी झालेली नसल्याने, आहे त्याच दराने पेट्रोल आणि डिझेल विक्री सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
केंद्राने सरकारने दोन दिवसापूर्वीच दुसऱ्यावेळेस अबकारी करात कपात केली. त्यामुळे डीझेल पेट्रोलचे दर किमान ८ ते १० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने देखील नाईलाजास्तव पेट्रोलचा २ रुपये ८ पैसे तर डिझेलचा १ रुपये ४४ पैसे व्हॅटचा कर कमी केला आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमात देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.
मात्र असे असताना, पेट्रोल पंप चालकांकडून अद्यापही राज्य सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्याचे चित्र दिसून येत नाही. राज्य सरकारच्या घोषणेनुसार रात्री बारा नंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणे गरजेचे होते. परंतु केंद्र सरकारने कमी केलेल्या कालच्या दरानुसारच अमळनेर शहर परिसरात पेट्रोल व डिझेल विक्री होत असल्याचे अनेक ग्राहकांना निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाहक ग्राहकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसत आहे. संबंधित जिल्हा पुरवठा आणि वजनमाप निरीक्षक अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालणे ग्राहकांच्या हिताचे होईल अशी मागणी जोर धरत आहे.