जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगरात भरदिवसा घरातून अज्ञात चोरट्याने चक्क तीन मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, विजय तुकाराम पाटील (वय-४८) रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २० मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास सर्व जण घरी असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून २८ हजार १०० रूपये किंमतीचे तीन मोबाईल चोरून नेले. दरम्यान विजय पाटील हे मोबाईल पाहण्यासाठी गेले असता त्यांना जागेवर मोबाईल दिसून आला नाही.त्यांनी घरात शोधाशोध केली असता इतर दोन मोबाईल देखील चोरी गेल्याचे लक्षात आले. तीन मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहे.