Home क्राईम आसोद्यातून एकाची दुचाकी लांबविली

आसोद्यातून एकाची दुचाकी लांबविली

0
62
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथे घरासमोरुन २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी  जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आसोदा येथे हंसराज सदू जाधव वय ६० हे वास्तव्यास आहेत. १९ मे रोजी हंसराज जाधव यांनी नेहमीप्रमाणे त्यांची एम.पी.६८, एम.एफ. ०२६७ या क्रमाकांची दुचाकी ते राहत असलेल्या घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने हंसराज यांनी शुक्रवारी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी हे करीत आहेत.


Protected Content

Play sound