पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सारोळा बुद्रुक – वाघुलखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कपबशी चिन्हावर लढलेल्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.
सारोळा बुद्रुक, वाघुलखेडा व सारोळा खुर्द या तीनही शेतकरी सभासदांची संस्था असलेल्या सारोळा विकास सोसायटीत अत्यंत खिलाडू वृत्तीने झालेल्या या निवडणुकीत मतदार सदस्यांनी शेतकरी पॅनलचा पराभव करीत सहकार पॅनलला दणदणीत विजय मिळवून दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सारोळा बुद्रुक विकास सोसायटीत प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच सहकार गटाचे महिला राखीव गटातून जनाबाई पाटील व निर्मलाबाई पाटील आणि अनुसूचित जाती जमाती गटातील हिरामण चंदनशिव हे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र सहकार पॅनल ला विरोध दर्शवत शेतकरी पॅनलने आपले ४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने उर्वरित १० जागांसाठी दि. २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.
अविनाश देशमुख, मुकुंदा पाटील, शिवाजी पाटील, उत्तम हवाळे, ठाणसिंग पाटील, त्र्यंबक पाटील, शंकर पाटील, खुशालराव देशमुख, अनिल देशमुख, नाना पाटील, बापू पाटील, महारु पाटील या पॅनल प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सहकार गटाने विजयश्री खेचून आणली. सर्व विजयी उमेदवारांनी अत्यंत साधेपणाने आपला विजयोत्सव साजरा केला.
सारोळा विकास सोसायटीतील नवनिर्वाचित उमेदवार व
त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे –
सर्वसाधारण मतदारसंघ–
दिनकर पंढरीनाथ हवाळे (१७८)
राहुल प्रकाश राव देशमुख (१७०)
कैलास ठाणसिंग पाटील (१६४)
गोपाल रामभाऊ पाटील (१६२)
विलास दयाराम बोरसे (१५४)
विष्णू मैनाजी पाटील (१४६)
अशोक शहादु वाणी (१४१)
शांताराम बाबुराव पाटील (१३१)
इतर मागास वर्ग मतदार संघ–
लक्ष्मण सांडू पाटील (११८)
विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ – संदीप रमेश पाटील (१२८)
महिला राखीव मतदार संघ – जनाबाई सुपडू पाटील (बिनविरोध)
निर्मलाबाई साहेबराव पाटील (बिनविरोध) अनुसूचित जाती जमाती मतदार संघ – हिरामण ओंकार चंदनशिव (बिनविरोध) एकूण ३२० मतदार सभासद संख्या असलेल्या विकास सोसायटी २५० सदस्यांनी मतदान केले त्यापैकी ३० मते बाद ठरली. एम. डी. नेहते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणूक प्रक्रियेत सहकार विभागाचे राहुल बोरसे, अशोक वाणी, प्रकाश बोरसे यांचे सहकार्य लाभले.