सर्व आस्थापनांनी ‘तक्रार निवारण कक्ष (समिती)’ गठीत करावी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे (सामाजिक व आर्थिक) सदस्य किशोर मेढे हे नुकतेच जळगाव दौरा आले होते.  यावेळी त्यांनी शासन निर्णयानुसार सर्व आस्थापनांनी “तक्रार निवारण कक्ष (समिती) ” गठीत करून त्या समितीचे कामकाज सुरू करावे असे निर्देश दिलेत.

 

किशोर मेढे यांनी राज्य आयोगाकडे आलेल्या जिल्ह्यातील विविध तक्रारींची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. तक्रारकर्ते व प्रशासन यांचे म्हणणे ऐकून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्याचे काम प्रशासनाने गतीने करायला हवे. शासनाच्या अनुसूचित जाती -जमातीच्या प्रवर्गासाठी असलेल्या विकास योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत गतीने पोहचायला हव्यात असे निर्देश त्यांनी याप्रसंगी सबंधितांन दिलेत. तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाने त्या तक्रारी तातडीने कायद्याच्या चौकटीत राहून सोडवाव्यात असे ही त्यांनी सबंधितांना सांगितले.जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनेत काम करणाऱ्या अनु.जाती व जमातींच्या त्या त्या विभागातील कर्मचारी वर्गांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शासन निर्णया नुसार सर्व आस्थापनांनी “तक्रार निवारण कक्ष (समिती) ” गठीत करून त्या समितीचे कामकाज सुरू करावे .असे निर्देशही त्यांनी उपस्थित संबंधित विभागांना दिले.

याप्रसंगी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन या विभागातील तक्रारींची सुनावणी झाली. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. किशोर मेढे यांची शासकीय विश्राम गृहावर जिल्ह्यातील अनेक शिष्टमंडळांनी भेट घेऊन अन्याया अत्याचारबाबत निवेदने व तक्रारी लेखी स्वरूपात आयोगास दिल्यात. पाचोरा तालुक्यातील कळमसरे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत आरोपींना कठोर शासन होण्यासाठी तसेच कुटूंबियांना पोलीस संरक्षण व पुनर्वसन होण्यासाठी चर्मकार विकास संघाचे जिल्हा अध्यक्ष अॅड .चेतन तायडे, उपाध्यक्ष गजानन दाडंगे, जिल्हासचिव प्रा. धनराज भारुडे,  राज्य प्रदेश सदस्य विश्‍वनाथ सावकारे, संजय वानखेडे सर, डी. के. तायडे सर, सदस्य कमलाकर ठोसर, खानदेश महिला अध्यक्ष ज्योतीताई निंभोरे, प्रा. रवि नेटके, ज्येष्ठ सल्लागार आर. आर. सावकारे  आदी पदाधिकारी यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातींच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाने ही त्यांची भेट घेऊन राखीव जागेवरील लोकप्रतिनिधिंना काम करू दिले जात नसल्याच्या तक्रारी करून आयोगास निवेदन दिले. या चर्चेच्या वेळी धरणगाव तालुक्यातील बांभोरी ,हिंगोणे ,सोनवद खुर्द ,अहिरे , तर यावल तालुक्यातील कोसगाव व रायपूर येथील सरपंच यांच्या सह मुकुंद सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ” रमाई घरकुल “योजनेच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रागतिक विचार मंच ,भुसावळच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा केली यात प्रा.डॉ. जतिन मेढे ,अध्यक्ष जे. पी. सपकाळे , प्रा. प्रशांत नरवाडे, समाधान जाधव ,प्रशांत तायडे, देवेंद्र तायडे, संघरत्न सपकाळे , बोदवड पं. स.माजी सभापती किशोर गायकवाड आदींची उपस्थिती होती. सर्व समस्या जलद गतीने कायद्याच्या चौकटीत राहून सोडविल्या जातील असे आयोगाचे सदस्य श्री.मेढे यांनी सर्व शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Protected Content