Home क्राईम दादरची कुट्टी जाळून केले नुकसान

दादरची कुट्टी जाळून केले नुकसान

0
101


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तरसोद शिवारात शेतकऱ्याच्या शेतातील ३० हजार रुपये किमतीची दादरची कुट्टी जाळून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नुकसान करणाऱ्या एका जणांविरुद्ध मंगळवार 17 मे रोजी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील येथील रहिवासी दीपक लक्ष्मण कोल्हे यांचे तरसोद शिवारात शेती आहे. 15 मे रोजी दीपक कोल्हे यांच्या शेतातील दादरच्या कुट्टीला संतोष मोतीराम राजपूत वय ५२ रां. तरसोद, यांनी जाळून नुकसान केले. या प्रकरणी शेतकरी दीपक कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी १७ मे रोजी सायंकाळी संतोष राजपूत यांच्या विरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार संजय जाधव हे करीत आहेत.03:40 PM


Protected Content

Play sound