Home क्राईम घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

0
128

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात त्याला अटक करण्यात आली आहे. मच्छिंद्र लक्ष्मण पवार रा. तेजस पार्क, जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आव्हाने शिवारातील तेजस पार्क येथील तरुण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांनी १६ मे रोजी बाहुबली तुकडे कारवाई केली. २ घरगुती गॅस सिलेंडर सह गॅस भरण्याचे मशीन असा 21 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुशील पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी मच्छिंद्र पवार या तरुणाला अटक केली आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.03:44 PM


Protected Content

Play sound