संविधान आर्मी संघटनेतर्फे रावेरात लाँग मार्च मोर्चा

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सामाजिक विविध मागण्यांसाठी संविधान आर्मी संघटनेतर्फे भोकरी ते रावेर तहसील कार्यालयात लॉंग मार्च मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर रावेर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आले.

लाँग मार्च मोर्चा व रेल रोको आंदोलन  संविधान आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यासंदर्भातील तहसिलदार कार्यालयाला निवेदन दिले. यावेळी अशोक अटकाळे, सिद्धार्थ झासे, इरफान तडवी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content